ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाच्या भव्य मैदानावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची महाविजयी निर्धार सभा मोठ्या उत्साहात

0
153

प्रतिनिधी अमर पाटील

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी आणि केंद्रात पुन्हा मोदी सरकार आणण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले…

हुपरीच्या अंबाबाईला स्मरण करून सांगतो की शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून इतरांना एकही मतांचे लीड मिळणार नाही अशी खात्री आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दिली. तसेच मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले…

यावेळी माजी कृषिमंत्री खासदार अनिलजी बोंडे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशजी हाळवणकर,आमदार प्रकाश आवाडे,हातकणंगले विधानसभेचे नेते दलितमित्र अशोकराव माने (बापू),महावीर आण्णा गाट,जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले,राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार,राहुल आवाडे,विजयजी भोजे,मनसे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव,शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव…

हुपरीच्या माजी नगराध्यक्षा जयश्री गाट,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके,रजनीताई मगदुम,आर.पी.आई राज्य सचिव मंगलराव माळगे,शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने,सुरेशदादा पाटील,मनसे जिल्हाप्रमुख गजानन जाधव,दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे,अण्णासाहेब शेंडूरे,हुपरीचे माजी नगरसेवक सुरज बेडगे,चांदी असोसिएशनचे सुभाषराव ससे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद माने यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here