पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मोठे प्राबल्य असणारा कै. माजी आमदार यशवंत दादा यांना मानणारा मोठा वर्ग आहे, सलग पंचवीस वर्षे विधानसभा मतदारसंघावर अधिराज्य करणारे दादा स्वर्गवासी झाले, काँग्रेस पक्षाशी असणारे ५० वर्षांपासून चे घनिष्ठ संबंध, व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मोठा प्रतिसाद तसेच महागाई, प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारी भारतीय जनता पक्षावर मतदारांचा असणारा रोष, भारतीय जनता पक्षाचे व शिंदे गटाचे फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते मा. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल गोकुळ संचालक मा. अमरसिंह पाटील (भाऊ), व यशवंत शिक्षण समूहाच्या अध्यक्ष मा. डॉ. जयंत पाटील यांनी सर्वानुमते मा. सत्यजित पाटील आबा यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठींबा जाहीर केला. त्यामुळे कै. दादा गटामध्ये एक नवचैतन्य संचारले आहे. सर्व अमर भाऊ व डॉ. जयंत पाटील यांच्या वर प्रेम करण्यार्या मतदारांनी गावातील गट तट विसरून, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन निष्ठेने येण्यार्या एका दिवसात काम करावे. व आबांना प्रचंड मोठ्या बहुमतांनी निवडून आणावे असे जाहीर केले आहे.