छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
55

कोल्हापूर, दि.९ (प्रतिनिधी) पापाची टिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय एकात्मतेचा विचार देशाला आजही जरुरीचे असल्याचे ॲड. धनंजय पठाडे यांनी सांगितले. याप्रसंगी महिलांनी छत्रपती शिवरायांचे पाळणा गीत गायले.
यावेळी मोहन माजगावकर, कैलास वागवेकर, निवास सूर्यवंशी,अमोल कुरणे, अभय बहिरशेठ, विशाल पाटील,अभिजीत वागवेकर, डॉ. प्राजक्ता सूर्यवंशी, आकाश परदेशी, अनिल वागवेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here