सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरु

0
88

प्रतिनिधी मेघा पाटील

 कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृहामध्ये 2024 -2025 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून दिनांक 20 मे 2024 पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. पहिल्या प्रवेश फेरीकरिता प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 जून 2024 आहे. सर्व युध्द विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक व सेवारत सैनिक व सैनिकांची अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. 

शिल्लक राहिलेल्या जागा सामान्य (सिव्हीलीयन) विद्यार्थ्यांना देण्यात येतील. सैनिकी मुलांचे वसतिगृह, सिंहगड, मेन पोष्ट ऑफिसजवळ, रमण मळा, कोल्हापूर- क्षमता 100 व सैनिकी मुलींचे वसतिगृह, शासकीय विश्रामगृहाजवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर – क्षमता 200 आहे.
प्रवेश फी प्रतिमहा खालीलप्रमाणे आहेत –
सेवारत सैनिक (भोजन, निवास व सेवा करासह)- अधिकारी – 3 हजार 500 रुपये, जे.सी.ओ.- 3 हजार रुपये व शिपाई/ एनसीओज- 2 हजार आठशे रुपये असणार आहे.

माजी सैनिक (सवलतीचे दर) भोजन, निवास व सेवा करासह-
अधिकारी व ऑननरी रँक – 3 हजार रुपये, जे.सी.ओ.- 2 हजार आठशे रुपये व शिपाई/ एनसीओज- 2 हजार पाचशे रुपये असणार आहे.

युध्द विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्य यांच्यासाठी नि:शुल्क तर सिव्हिलीयन भोजन, निवास व सेवा करासह (पूर्ण दर) 3 हजार पाचशे असणार आहे.

प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम 1 हजार रुपये आकारण्यात येईल. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. प्रवेशपुस्तिका पूर्ण करुन संबधित वसतिगृहामध्ये जमा करावी.

वसतिगृह प्रवेशासाठी खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल –
युध्द विधवा / माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिकांची अनाथ पाल्ये, पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये), बी.एड.डी.एड.,पदवी अभ्यासक्रम (गुणवत्ता यादीप्रमाणे), 12वी, 11वी व 10वी, या क्रमाने (गुणवत्ता यादीप्रमाणे), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असलेस सिव्हिलीयन पाल्य (मा. संचालकांच्या परवानगीने) याप्रमाणे राहील.
अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, सिंहगड, मेन पोष्ट ऑफिसजवळ, रमण मळा, कोल्हापूर 8318610968 व सैनिकी मुलींचे वसतिगृह, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर 9404581947 वर संपर्क साधावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here