प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कागल :लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सर्वजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवत असतात.तशाच आठवणी कोल्हापुर जिल्ह्यातील व्हनाळी ता.कागल येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी व शिक्षकांसमवेत जाग्या केल्या. निमित्त होते स्नेहमेळाव्याचे.! शिक्षकांनी केलेले सुसंस्कार, चुकीच्या वेळी केलेली ती शिक्षा,वर्गातील गमती जमती,परीक्षेचा तणाव,निकालाची उत्सुकता,अशा अनेक आनंदी,तर काही भावनिक आठवणीना उजाळा देत व्हनाळी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीमधील २००३/०४ सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हॉटेल यश राजवाडा भिवशी येथे उत्साहात पार पडला.तब्बल २१ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनी भारावलेल्या वातावरणात एकमेकांशी सुसंवाद साधला.प्रारंभी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्लासमेट ग्रुपचे अध्यक्ष श्री.कुणाल पाटील व सौ.अश्विनी कडवे यांनी भूषविले.तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक वृंद श्री.राजाराम माने (शेंडूर),प्रकाश मगदूम (एकोंडी),विश्वास रणदिवे (वंदूर),व सौ.पल्लवी कोरे (कागल) हजर होते.दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पांडुरंग वाडकर,प्रियांका वाडकर,गणेश जाधव, कृष्णात पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभवावर मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास अनिल वाडकर,प्रविण वाडकर,जयवंत वडर,उत्तम वायकोस,उत्तम कुळवमोडे,नितिश निचिते,कृष्णात जाधव,दशरथ वाडकर,राहुल कदम,संपदा मगदूम,गीता भोपळे,सुनिता सुतार,पुनम पाटील,अनिता वाडकर,वनिता वाडकर,वनिता कुळवमोडे,गीता कुळवमोडे,लता पालकर,सरिता पवार,सरिता म्हातुगडे,मनिषा कोरवी आदी उपस्थित होते.
स्वागत व सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.
Home Uncategorized २१ वर्षानंतर भेटले लहानपणीच्या शाळेतील विद्यार्थी; कागल तालुक्यातील व्हनाळी गावातील माजी विद्यार्थ्यांचा...