प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर (जिमाका) दि. 29 : 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउददेशीय हॉल रमणमळा या ठिकाणी तर 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी राजाराम तलाव, सरनोबतवाडी येथे असलेल्या नवीन प्रशासकीय इमारत, राजाराम तलाव येथे 04 जून 2024 रोजी होणार असून या अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये या परिसरातील मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच नागरिक, मोटार वाहन चालक व रहिवाशी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खालील नमूद मार्गावर (शासकीय व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून) प्रवेश बंद करण्यात येत आहे. तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचा जाहिरनामा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी प्रसिध्द केला आहे.
रमणमळा येथील मतमोजणीच्या अनुषंगाने रहदारीचे नियमन याप्रमाणे- वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात व वळविण्यात येणारे मार्ग :- (अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड यांची वाहने खेरीज करुन)
सीपीआर चौक ते कसबा बावडा कडे जाणारे सर्व वाहनांना महावीर कॉलेज चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी पाटलाचा वाडा, कलेक्टर ऑफिस चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे. पितळी गणपती चौक ते एस.पी. ऑफिस चौक जाण्यास व येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना पितळी गणपती या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी धैर्यप्रसाद चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे. कसबा बावड्याकडून पोस्ट ऑफिस मार्गे सीपीआर कडे जाणा-या सर्व वाहनांना ४ नं. फाटक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी लाईन बाजार चौक, सर्कीट हाऊस मार्गे पुढे मार्गस्थ व्हावे. रमण मळयातून येवून ड्रिमवर्ल्डचे पाठीमागील रोडने धोबी कट्टा पर्यंत ये-जा करण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे जाण्यास तसेच रमणमळा येथील पवार बंगल्याकडून धान्य गोडावूनकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पार्किंग सुविधा – मतमोजणीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांचे वाहनासाठी पार्किंग- पोलीस मुख्यालय गार्डन समोरील रिकामी जागा आणि पोलीस फुटबॉल ग्राऊंड या दोन ठिकाणी करण्यात येत आहे.
निवडणूक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहन पार्किंग :- रेणुका मंदिर पाठीमागील बाजू १०० फुटी रोडवर (दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता) ४ नं. शाळेचे मैदान (दुचाकी वाहनांकरीता) शिंदे नर्सरी समोरील रस्त्याचे पलीकडील आत जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजुस (चारचाकी वाहनांकरीता). मेरी वेदर मैदान च्या मैदानावर (दुचाकी वाहनांकरीता) सेंट झेव्हीयर्स शाळेचे मैदान (दुचाकी वाहना करीता) होमगार्ड कार्यालय मैदान (दुचाकी वाहनां करीता) येथे करण्यात येत आहे.
रमणमळा परिसरातील स्थानिक रहिवाशांसाठी सूचना याप्रमाणे- यशवंत सोसायटी पोवार मळा या भागातील रहिवाशांनी येण्या जाण्यासाठी १०० फुटी रोडचा वापर करावा. रमणमळा, १०० ठाण, जावडेकर सोसायटी, तसेच छत्रपती शाहू हायस्कूल परिसरातील लोकांनी येण्या जाण्यासाठी पोलो ग्राऊंड, छत्रपती शाहू हायस्कूल, महावीर कॉलेज किंवा प्राणी संग्रहालय पाठीमागील फाटक ते महावीर कॉलेज या मार्गाचा वापर करावा.
राजाराम तलाव येथील मतमोजणी अनुषंगाने रहदारीचे नियमन याप्रमाणे- वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग (अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड यांची वाहने खेरीज करुन ) :- सरनोबतवाडीकडून राजाराम तलाव मार्गे छत्रपती शिवाजी विद्यापीठकडे जाणा-या सर्व वाहनांना सरनोबतवाडी अंडर ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी उजळाईवाडी अंडरब्रिज, शाहू टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे. (सरनोबतवाडी गावचे रहीवाशी यांची वाहने वगळून) हायवे कॅन्टीन चौक, सरनोबतवाडी नाका, राजाराम तलाव मार्गे हायवेला जाणा-या सर्व वाहनांना सरनोबतवाडी टी पॉईंट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शाहु टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
पार्किंग सुविधा – मतमोजणीसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या वाहनासाठी पार्किंग मतमोजणी ठिकाणच्या समोरील रिकाम्या जागेमधे (रस्त्याच्या पलिकडे) करण्यात येत आहे.
निवडणुक निकाल पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहन पार्किंग :- युको बँक शेजारील रिकाम्या जागेवर. शिवाजी विद्यापीठ नवीन म्युझियम इमारत शेजारील मोकळी जागा. नॅनो सायन्स/वृत्तपत्र इमारत छत्रपती शिवाजी विदयापीठ समोरील मोकळी जागा. एच. पी. गॅस गोडावून समोरील रिकाम्या जागेवर करण्यात येत आहे.
वरील निर्देश हे दिनांक 04 जून 2024 रोजी पहाटे ५ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होवून गर्दी संपेपर्यंत लागू राहतील.
000000