हातकणंगलेतील मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

0
54

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): हातकणंगले येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक कोल्हापूर शहर व परिसरामधील विद्यार्थिनींनी मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एस.ए. गडकरी यांनी केले आहे.

वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ, इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक सोयीसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9421077266 वर संपर्क साधावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here