चाफोडी ता. करवीर येथे 31 मे रोजी बुद्ध विचार महोत्सव.
प्रा. सुकुमार कांबळे यांच्या व्याख्यानाची तोफ धडाडणार
प्रतिनिधी वैभव प्रधान
बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून. ब्लड रिलेशन प्रणित संघर्ष ग्रुप चाफोडी ता.करवीर यांनी बुद्ध विचार महोत्सवाचं आयोजन केले आहे. सायंकाळी ६.०० वाजता आंबेडकरी विचारांची मुलुख मैदानी तोफ,वक्ते प्रा.सुकुमार कांबळे सर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे असणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक गौतम वर्धन सर हे असून या कार्यक्रमाचे बाळासाहेब वाशीकर,प्रा.आनंद भोजने,राजेंद्र ठीकपुर्लीकर, संजय कुर्डूकर, पी.डी. सरदेसाई यांची प्रमुख पाहुणे असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सातापा सुर्वे, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रकाश चव्हाण, उपसरपंच सुनीता उत्तम खोंद्रे, तसेच गावातील प्रतिष्ठित पोलीस पाटील भगवान पाटील, माजी सरपंच तानाजी काशीद, नानासो पाटील, दादू सुर्वे, शंकर पाटील, बळवंत पाटील, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, मा.सरपंच पंढरीनाथ भोपळे यांसहित अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बलभीम सेवा संस्थेचे नूतन संचालक दगडू जो. कांबळे, पंचायत समिती करवीर विशेष कार्यकारी अधिकारी. म्हणून निवड झाल्याबद्दल बळवंत मा.कांबळे, पैलवान प्रवीण पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच सायंकाळी८.०० वाजता ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सत्यशोधक चित्रपट दाखवला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भीमराव कांबळे सर असून या कार्यक्रमाला चाफोडी आणि चाफोडी परिसरातील सर्वांनीच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक वैभव प्रधान सर यांनी केले. या बैठकीला अध्यक्ष अतुल कांबळे, सचिव सुनील कांबळे, खजानिस गुरुनाथ कांबळे, उपाध्यक्ष रुपेश कांबळे, कार्याध्यक्ष साहिल कांबळे ,सदस्य: कपिल कांबळे सर ,कमलाकर कांबळे, संदीप कांबळे, अमित कांबळे, अक्षय कांबळे, जितेंद्र कांबळे, शुभम कांबळे ,शशांक कांबळे, आकाश कांबळे ,संस्कार कांबळे, सुमित कांबळे, विजय कांबळे, शैलेश कांबळे, समीर कांबळे, यश कांबळे,पार्थ कांबळे हे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.