शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच दिनांक २६ मे २०२४ रोज रविवारला संपन्न झाली फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव श्री गणेश कोळी सर यांनी या मीटिंगचे आयोजन व नियोजन केले .
या सभेमध्ये उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष अमरावती येथील डॉ. सतीश तराळ सर राज्य समन्वयक पुणे येथील प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल राज्य उपाध्यक्ष वर्धा येथील डॉ. मनीषा रिठे अकोला येथील फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ. अशोक शिरसाट राज्य खजिनदार कवी रामदास कोरडे विदर्भ विभागीय महीला उपाध्यक्षा अकोला येथील डॉ. लताताई थोरात, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे धाराशिव जिल्हा महिला समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार आणि श्री शंकरराव अनासुने सर बुलढाणा जिल्हा सदस्य श्री बाळूभाऊ इटणारे अकोला जिल्हा अध्यक्ष श्री अमोल अनासूने धुळे जिल्हा अध्यक्ष श्री अश्विन अमृतकर सर उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक डॉ. राजेश गायकवाड, अहमदनगर आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे आहे.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष
प्रा. डॉ. खुशाल मुंडे, पुणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव श्री रामचंद्र गुरव, पुणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्री राजेंद्र मकुटे, कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र विभागीय महिला उपाध्यक्ष सौ. मेघाताई रमेश पाटील, सांगली पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुख प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, सोलापूर पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रसिद्धीप्रमुख श्री सुनील सामंत कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र विभागीय सल्लागार एडवोकेट अनिता देशमुख ,पुणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सल्लागार सौ.रूपालीताई चिंचोलीकर ,पुणे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटक सातारा येथील सौ. अनुराधा गुरव आदि पदाधिकाऱ्यांची निवड केली उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीच्या नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवून मनापासून अभिनंदन स्वागत केले याप्रसंगी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व फाउंडेशन साठी सहकार्य करण्याचे सांगितले शेवटी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. प्रसंगी फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी देवाची या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घेण्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केले.