.
प्रतिनिधी सृष्टी पाटील
कोल्हापूर/ इचलकरंजी दिनांक 29 इचलकरंजी महानगरपालिका येथील सभागृहा मध्ये रास्त भाव धान्य दुकानदार यांना पॉस मशीन वाटप अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने व रेशन संघटना जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे यांच्या हस्ते संपन्न रेशन व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी तसेच पात्र लाभार्थ्यांना शिधा मिळण्यासाठी राज्य सरकारने पूर्वी टूजी पॉस मशीन दिली होती
त्याची मुदत संपून त्या ठिकाणी नवीन 4g मशीन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला जुन्या मशीन मुळे तांत्रिक अडचणी होऊन त्यामध्ये कार्डधारक व रेशन दुकानदारांच्या बऱ्याच वेळेला वादावादीचे प्रसंग निर्माण होत होते आता नव्याने दिलेल्या मशीनमुळे सुलभता येणार आहे सध्या दिलेल्या मशीन मध्ये अंगठ्याच्या ठश्याबरोबर डोळ्यांचे स्कॅनर ची सुविधा उपलब्ध केले आहे शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे बरेचदा बोटांचे ठसे मशीनवर स्पष्ट उमटत नव्हते त्यामुळे त्यांना धान्य देण्यास अडचण येत होती .
आता नव्या मशीन मुळे सर्व कारधारकांना रेशन मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे यावेळी पुरवठा निरीक्षक सुरेखा पोळ इचलकरंजी शहर अध्यक्ष पांडुरंग सुभेदार अनवर मोमीन दीपक ढेरे गुंडाफेगडे नामदेव पाटील बाळासो मुजावर मिलिंद पवार तेजस्विनी पाटील ग्राहक समिती सदस्य रमेश पाटील जिल्हा तांत्रिक कर्मचारी करण गायकवाड व्हीजनटेक प्रतिनिधी सुभाष जाधव, प्रशिक्षक माणिक भालेकर , तसेच सुमित पवार, तालुका प्रतिनिधी आशिष पाटील आदी उपस्थित होते.