प्रतिनिधी मेघा पाटील
कासारवाडी ता.हातकणंगले येथे अभिषेक खोत व संपदा खोत यांनी नव्याने सुरु केलेल्या श्री स्वामी कलेक्शन या लेडीज वेअर कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
कासारवाडी या गावांमध्ये अभिषेक खोत व इंद्रजीत खोत या दोघा बंधूंनी गावातील ग्रामस्थांसाठी व जोतिबा डोंगर व पन्हाळा गड येथे जाणारे पर्यटक यांच्यासाठी सुपर बाजार ची स्थापना केली. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले सुपर बाजार उत्तम सेवा त्याचबरोबर शंभर टक्के शुद्ध ताजे पदार्थांची सेवा देत आहेत. इंद्रजीत खोत हे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक आहेत. त्यांनी आपला प्रामाणिकपणा जिद्द व चिकाटीच्या जोरावर खूप कमी कालावधीमध्ये समाजामध्ये आपला एक ठसा उत्तम प्रकारे उमटवला आहे.त्याचाच खांद्याला खांदा देऊन दुसरे बंधू अभिषेक खोत यांचा ए बी आर के फिल्म प्रोडक्शन कंपनी व तिथेच स्टुडिओ आहे त्यांनीही आपले योगदान कलानगरीमध्ये दिले आहे. नवनवीन कलाकारांसाठी ते एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. नवनवीन युवक व युवती कलाकार घडवण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा निस्वार्थ प्रयत्न करत आहेत. या दोघा बंधूंना घरातील आई-वडिलांचा, खोत परिवार व मित्र परिवाराचा खूप मोठा सपोर्ट व मार्गदर्शन आहे.खूप प्रतिकूल परिस्थिती मधून त्यांनी जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर हे स्वतःचे समाजामध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. या दोघा बंधूंचे गावातून व समाजा मधून कौतुक होत आहे.अशा या दोघा बंधूंनी सुपर बाजार ची स्थापना केल्यानंतर गावातील लोकांना सर्व प्रकारच्या कपड्यांची सोय व्हावी यासाठी सर्व प्रकारच्या कपड्याचे दालन नागरिकांना सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहे.. खास सुरत वरून वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये व चांगल्या दर्जाची कपडे उपलब्ध करून दिली आहेत. खास महिलांसाठी सुरत वरून उत्तम दर्जाच्या साड्या उपलब्ध करून दिले आहेत.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिग्गज मान्यवर व गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर महिला उपस्थित होत्या.
या उद्घाटन कार्यक्रम वेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते व सरपंच अच्युत खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले
यावेळी मातोश्री रमाबाई सूतगिरणी चे चेअरमन अनिलराव कवाळे,उपसरपंच विलास खोत,बाबासो खोत,राहुल आवाडे युवा शक्ती चे अध्यक्ष वैभव हिरवे, सागर पाटील चेअरमन SP-9 मराठी माध्यम समूह श्री रविशंकर पिठाचे राजेंद्र जाधव,शंकर वाघवे,गोविंद पवार,इंद्रजित खोत,अनिल माने,ग्रा प सदस्य आनंदा पोवार,लखन माने रमेश इंगवले हर्षवर्धन चव्हाण रमेश पाटील सागर शिंगे यशवंत चौगुले, पत्रकार किरण मस्कर, प्रकाश निकम, रुपेश खोत यांसह ग्रामस्थ महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या,,,,,