जिल्ह्यातील 18 उपनिबंधक कार्यालयांपैकी 10 उपनिबंधक कार्यालयांना जागा मंजूर-अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे

0
89
  • ज्येष्ठ प्रतिनिधी : राजेंद्र मकोटे

सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 करवीर कोल्हापूर या कार्यालयाच्या नुतनीकरणाचे उद्वघाटन

कोल्हापूर, दि.8 (जिमाका): जिल्ह्यात 18 उपनिबंधक कार्यालये आहेत त्यापैकी 10 कार्यालयांना जागा मंजूर केली आहे. तर शहरातील जिल्हा निबंधक कार्यालय व 4 उपनिबंधक कार्यालयांसाठी 15 गुंठे जागा उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर कार्यालय बांधण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केली.
सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 करवीर कोल्हापूर या कार्यालयाच्या नुतनीकरणाच्या उद्वघाटनावेळी ते बोलत होते. यावेळी, सह जिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा सरकारी वकील श्री. शुक्ला, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.खोत हे उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविद्या देण्याचा प्रयत्न करावा, कार्यालयाचे सुशोभिकरणामुळे दस्त नोंदणीचे कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होईल. प्रास्ताविकात श्री. वाघमोडे म्हणाले, नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे नुतनीकरणासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. या योजनेमध्ये जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, करवीर क्र. 2 कोल्हापूर या कार्यालयाची निवड करण्यात येऊन कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी रु. 10 लक्ष इतका निधी स्वीय प्रपंजी लेख्यातून मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीतून कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होतील. अशा पध्दतीने कार्यालयाचे नुतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील दुय्यम निबंधक श्री. गोंधळी, श्री. डोंगरे, श्री. नेवासकर, तानाजी नाईक, श्रीम. कपसे, श्रीम. गावडे, श्रीम. चव्हाण तसेच सर्व नोंदणी विभाग कोल्हापूरचे कर्मचारी तसेच कोल्हापूर बार असोसिएशनचे विधिज्ञ, नागरिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here