महिला महाविद्यालय सायबर येथे उद्बोधन कार्यक्रमाची सुरवात पालक सभेने..

0
102

कोल्हापूर प्रतिनिधी : मेघा पाटील

महिला महाविद्यालय सायबर येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी नवीन प्रवेशित विद्यार्थिनींसाठी उद्धबोधन कार्यक्रमाची सुरवात पालक सभेने करण्यात आली. पालक प्रतिनिधी, प्रभारी प्राचार्या श्रीमती प्रज्ञा कापडी, प्रो.डॉ.ए.आर कुलकर्णी व सर्व विभाग प्रमुख ह्यांच्या उपस्तिथीत दीप प्रज्वलाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रो.डॉ.ए.आर कुलकर्णी यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 व अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स याची ओळख करून दिली. प्रभारी प्राचार्या श्रीमती प्रज्ञा कापडी यांनी घेण्यात येणाऱ्या उद्बोधन कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. यानंतर श्रीमती प्रज्ञा कापडी फॅशन डीझाईन, डॉ.नीलम जिरगे फूड टेकनॉलॉजि, आर्किटेक्ट सीमा पाटील इंटिरियर डीझाईन, प्रा.प्रियांका चव्हाण पर्यावरण शास्त्र व प्रा.सविंदर कौर गांधी कॉमर्स या विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या कोर्सेसची ओळख करून दिली. शारीरिक शिक्षण संचालक श्रीमती रामेश्वरी गुंजीकर जिमखाना विभागातील उपलब्ध सोयींची माहिती करून दिली. प्रशासकीय अधिकारी श्री.बी.एस मंदिलकर यांनी कार्यालय कार्यपद्धती आणि उपलब्ध शिष्यवृत्ती यांची माहिती करून दिली. ग्रंथपाल श्रीमती अनुराधा कुंभार यांनी ग्रंथालय सुविधांची ओळख करून दिली. मुलींच्या वसतिगृहातील सुविधांची माहिती प्रा.ज्योती हिरेमठ यांनी दिली. या पालक सभेस 250 हून अधिक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनीता दलवाई यांनी केले आणि प्रा. रितिका चंदवानी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास सायबर ट्रस्टचे प्रेसिडेंट व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर.ए.शिंदे व सेक्रेटरी सी ए. , एच.आर. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here