जिथे कमी तिथे आम्ही या तत्त्वावर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून प्रियदर्शनी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा उस्थळे येथील विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य वाटप..

0
66

प्रतिनिधी मेघा पाटील

नमस्ते नाशिक फाउंडेशन संस्थेतर्फे गुरुकृपा आदिवासी शिक्षण मंडळ पेठ यांच्या प्रियदर्शनी आदिवासी प्राथमिक व माध्यमिक शाळा उस्थळे तालुका पेठ येथे विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामध्ये रेनकोट, छत्री, अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे. शाळेतील ५७६ विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर राहुल बाविस्कर, यांच्या हस्ते मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेच्या परिसरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाप्रसंगी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर सायली गाळणकर, प्रसिद्ध दंत रोग तज्ञ डॉक्टर विशाल गाळणकर महाराष्ट्र हास्य योगा क्लबचे अध्यक्ष सुनील कोटकी, लक्ष्मीकांत विसावे,सुनंदा दसपुते, सरला मुसळे, मीनाक्षी नागपुरे,वैशाली पाटकर श्री इंटरप्राईजेस च्या संचालिका मोनाली अमृतकर,, गुरुकृपा आदिवासी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विठोबा भोये, सदस्य दिनकर भोये, मुख्याध्यापक प्राथमिकचे खंडेराव जगदाळे व माध्यमिकचे आर जी पाटील पोलीस पाटील देविदास भोये आदी मान्यवर उपस्थीत होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री व्ही वी शेवाळे, आर एम महाजन, आर एम बुवा, ए बी घुगे, एम के चौरे, एस डी डांबरे ,श्रीमती वनश्री भोये, श्री मदन महाले, अशोक पवार आधी शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीयुत विठोबा भोये यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशन चे श्रीयुत संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले .तसेच सूत्रसंचालन पी एस पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here