प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 17 :* अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता महाराणी ताराबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांचे मनोगत तसेच मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन व अल्पसंख्याक हक्क दिवस योजना अंमलबजावणी सहभागाबाबत चर्चा, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, तथा अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी विजय भोपळे यांनी केले आहे.