
SP-9 प्रतिनिधी स्वप्निल गोरंबेकर
मुरगुड/कागल: मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयचे महात्मा फुले ग्रंथालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुरुवातीस प्रतिनिपूजन महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. एम.डी. भोई सर व भूगोल विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक दादासाहेब सर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रंथपाल प्रा. तानाजी सातपुते सर हे होते.तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संयोजक महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे बस्तवडेकर यांनी केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.

तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभागाचे प्राध्यापक व युवा कीर्तनकार नितेश रायकर सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महात्मा फुले यांच्या विषयी बोलताना विद्येचे महत्त्व पटवून देता त्यांनी धर्मातील मध्यस्तांची मक्तेदारी अममान्य करत सर्वांना सर्व अधिकार आहे , सर्वजण समान आहेत ही भूमिका मांडताना महात्मा फुले यांनी संत कबीर व तुकाराम महाराज यांच्या अभगांचे प्रमाण देऊन स्पष्ट केले. यावेळी ग्रंथालय परिचर श्री संजय भारमल , श्री सदाशिव गिरी बुवा तसेच विद्यार्थी शितल तोडकर, पूजा करडे , पदमा कांबळे, श्रेया कुंभार, वैष्णवी कुंभार, अनुराधा मोहिते, प्रणय कांबळे , मृणाली पाटील, श्री गणेश गुरव, सुशांत मसवेकर, सानिका पाटील, प्रथमेश येरुडकर व मधुरा जाधव व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी सर्वांचे आभार पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक दयानंद कांबळे सर यांनी मांडले.
