
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
इंदापूर, पुणे येथे 27 ते 28 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय कुराश स्पर्धेत विवेकानंद कॉलेजची अनुष्का अजित पाटील (इयत्ता ११वी, विज्ञान) हिने अतिशय दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उज्ज्वल कामगिरीच्या जोरावर तिची उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून कोल्हापूरचा अभिमान आणखी उंचावला आ
अनुष्काच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या यशामागे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे महत्त्वपूर्ण प्रोत्साहन लाभले.
तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात, ज्युनिअर जिमखाना प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस.के. धनवडे व सुरेश चरापले यांचेही विशेष मार्गदर्शन तिला मिळाले.
अनुष्काने राष्ट्रीय पातळीवर चमकावी, अशी अपेक्षा महाविद्यालय व संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आली आहे.

