
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर:- संस्थान काळातील पैलवान व फुटबॉल खेळाडू, प्रिंटिंगप्रेस तज्ञ मेकॅनिक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अभिमन्यू अर्जुन कदम. यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी १० वाजता “महाराष्ट्र शासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या “स्वातंत्र्याची शिलेदार” ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अभिमन्यू अर्जुन कदम. निवासस्थान. या नामफलकाचे पूजन शिपुगडे तालमीचे माझी पैलवान विश्वास पाटील (दादा) यांच्या हस्ते व कदम कुटुंबाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर.११ वाजता. शाहू स्पोर्ट्स (सोनतळी) यांच्या वतीने संस्थान काळातील सोनतळी येथील तुळजाभवानी मंदिरातून पुजारी जयराज पीटके व दत्तात्रेय हवलदार आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्केटिंग रॅलीची सुरुवात करण्यात आली. रजपुतवाडी, वडनगे फाटा, आंबेवाडी, शिवाजीपुल या ठिकाणी ज्योतीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अभिमन्यू अर्जुन कदम. यांच्या जुना बुधवार पेठेतील निवासस्थानी ज्योत आणण्यात आली. त्या ठिकाणी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे. यांच्या हस्ते ज्योतीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सौ.महेश्वरी कदम. सौ.शारदा भोसले.सौ.सुप्रभा कदम .ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी अभिमन्यू कदम यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई कदम. यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्केटिंग रॅलीत सहभागी झालेल्या स्केटरना गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सायंकाळी जुना बुधवार पेठेतील भजन मंडळाच्यावतीने सामूहिक भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम.
राष्ट्रीय कोच भास्कर कदम. शशिकांत पाटील. रूपाली शिंदे यांनी केले.
माननीय ,
संपादकसो——–_
आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम.
छायाचित्रात:- स्मृती ज्योतीस अभिवादन करताना श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम. सौ महेश्वरी कदम.सौ रूपाली शिंदे. शशिकांत पाटील. दत्तात्रय हवलदार आंतरराष्ट्रीय स्केटिंग कोच.प्रा. डॉ. महेश कदम. राष्ट्रीय कोच.भास्कर कदम.

