यशप्राप्ती साठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही -डॉ.विजयकुमार पाटील

0
31

श्रीपतराव चौगुले कॉलेज, माळवाडी (कोतोली) येथे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील. समवेत डॉ. उषा पवार, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. एस. पी. कुंभार आदी.

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
यशप्राप्तीसाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. यश मिळवताना गुणात्मक शिक्षणाइतकेच संस्कार आणि बौद्धिक ज्ञान महत्त्वाचे आहे. शाळेने दिलेल्या ज्ञानरूपी शिदोरीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळवावे. मन, मनगट आणि मेंदूच्या बळावर यशाला गवसणी घालता येते. विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वतःचे, शाळेचे तसेच आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
ते श्रीपतराव चौगुले कॉलेज, माळवाडी (कोतोली) येथे आयोजित इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ. उषा पवार उपस्थित होत्या.यावेळी सूर्यकांत कांबळे, सलोनी देवांगळे, श्रावणी चौगुले, प्रमिला पाटील, साक्षी पाटील, अंजली पाटील, ओंकार पाटील व श्रेयश स्वामी यांनी मनोगतातून शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.प्रा. आर. बी. पाटील, प्रा. एस. पी. कुंभार, श्रीमती सीमा पाटील व श्रीमती विश्वजा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उषा पवार यांनी केले. सूत्रसंचालन जान्हवी कांबळे हिने केले, तर आभार डी. आर. धडेल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here