
कोल्हापूर (प्रतिनिधी): पांडुरंग फिरींगे
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. महाविद्यालयातील सर्व शाखांतील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एन.एस.डी.सी. पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया जी.टी.टी. पुणे व विवेकानंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या टेलिफोनिक वैयक्तिक मुलाखतींमधून तब्बल ५२ विद्यार्थ्यांची नामांकित ब्रिटानिया इंडस्ट्रीज, पुणे येथे निवड झाली आहे.ही निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जी.टी.टी. पुणेचे प्रतिनिधी श्री. शिरीष टेमगीरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना उद्योगविश्वाशी जोडणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.तसेच अंतर्गत गुणवत्ता मूल्यमापन हमी कक्षाच्या डॉ. श्रुती जोशी, प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. सतीश चव्हाण, डॉ. संजय लठ्ठे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. अस्मिता तपासे, प्रा. पल्लवी देसाई, डॉ. आशुतोष उपाध्ये, डॉ. अभिजीत कासारकर, प्रा. वृषाली मिसाळ तसेच प्रबंधक श्री. सचिन धनवडे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून या यशात मोलाचा वाटा उचलला.विवेकानंद कॉलेजमधील ५२ विद्यार्थ्यांच्या या यशस्वी निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व प्लेसमेंट क्षेत्रातील विश्वासार्हतेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.


