शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या 15 विद्यार्थ्यांना पारितोषिके

0
34

प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे

कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी दरवर्षी वार्षिक नियतकालिक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी विविध साहित्यप्रकारांतून लेखन करून आपल्या कलागुणांची अभिव्यक्ती करतात.
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच वैयक्तिक गटात महाविद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी विविध साहित्य प्रकारांत पारितोषिके मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
पारितोषिक विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
श्रीशैल शिंदे – मराठी (एकांकिका) – प्रथम
प्रेरणा जाधव – मराठी (वैचारिक लेखन) – द्वितीय
पूजा पोपले – मराठी (माहितीपर लेखन) – प्रथम
प्रतिज्ञा पालकर – मराठी (संशोधन लेख) – प्रथम
खुशी शर्मा – इंग्रजी (एकांकिका) – तृतीय
प्रतिक्षा दळवी व दीक्षा पवार – इंग्रजी (मुलाखत) – द्वितीय (विभागून)
वैष्णवी ढेंगे – इंग्रजी (मुलाखत) – तृतीय
साहिल पाटणेकर – इंग्रजी (समीक्षा) – प्रथम
तसनीम देसाई – इंग्रजी (माहितीपर लेखन) – तृतीय
ऋतिका साळोखे – हिंदी (एकांकिका) – द्वितीय
साहिल खरारे – हिंदी (व्यक्तिचित्र) – तृतीय व (मुलाखत) – प्रथम
तहसिन नाईकवडी – हिंदी (आत्मकथनपर लेखन) – प्रथम
साक्षी दुबे – हिंदी (वैचारिक लेखन) – द्वितीय
श्रावणी कालेकर – कला कौशल्य (छायाचित्र) – तृतीय
या नियतकालिकाचे संपादक म्हणून प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी कार्य पाहिले. विभागीय संपादक तसेच ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.या उल्लेखनीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सी.ई.ओ. श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, रजिस्ट्रार श्री एस. के. धनवडे तसेच प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी संपादक मंडळ व पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here