कोल्हापूर येथील – शैलेश पाटील यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

0
81

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

शाहुपुरी – कोल्हापूर येथील भाजपचे कार्यकर्ते शैलेश… पाटील यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

याबाबतचे निवड पत्र नुकतेच भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय जाधव यांनी दिले आहे.

शैलेश पाटील यांनी भाजप पक्षाचे कार्य तसेच विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच ते खा. धनंजय महाडिक यांचे गेली पंचवीस वर्षांपासुनचे विश्वासू कार्यकर्ते आहेत .

उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, पदाधिकारी सुहास आण्णा लटोरे, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, सत्यजित (नाना) कदम, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक या सर्वांच्या सहकार्याने त्यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल शैलेश पाटील यांचे शाहुपुरी परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here