मुरगुडमध्ये भाच्याकडे आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

0
232

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

भाच्याकडे राहण्यासाठी आलेल्या कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर मधील युवकाचा मुरगूड (ता कागल) मधील एका बागेत मृत्यदेह आढळून आला होता ‌.

मृत युवकांचे नांव प्रभाकर भिमराव भोसले वय (४३) असून या घटनेची नोंद मुरगुड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे. याबाबत मुरगूड पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर राजेंद्र नगर मध्ये सदर युवक घरी एकटाच राहत होता‌.

प्रभाकर भोसले हा युवक गेली पंधरा दिवसापासून भाचा रोहित खवले याच्याकडे मुरगुड येथे राहण्यास आला होता. तो दिवसभर बाहेर थांबायचा रविवारी (२४ सप्टेंबर) सकाळी ७ वाजल्या नंतर तो घरातून बाहेर गेला‌.

यांच दरम्यान मुरगूड गावभागातील मारुतीच्या मंदिराच्या मागे असणाऱ्या विजयमाला मंडलिक उद्यानात त्याचा मृत्यदेह ११ वाजण्याच्या सुमारास आढळून आला‌ याबाबतची माहिती भाचा रोहित खवले यांनी मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये दिली.

यानंतर पंचनामा करून मुत्यदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मुरगूड येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत प्रभाकर भोसले हा अविवाहित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here