एक हात मदतीचा, दर्शन घडवुया माणुसकीचे – चेअरमन डॉ.सीमा अनिल इंगोले …

0
133

एक हात मदतीचा, दर्शन घडवुया माणुसकीचे – चेअरमन डॉ.सीमा अनिल इंगोले …

S D R फौंडेशन कोल्हापूर यांच्या मार्फत आज दिनांक 6 ऑक्टोबर शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथील 1 ली ते 4 थी च्या विध्यार्थीना SDR फौंडेशनच्या चेअरमन डॉ सीमा अनिल इंगोले च्या हस्ते दप्तर वितरण करण्यात आले..


सामाजिक दायित्व जपणाऱ्या फौंडेशन च्या चेअरमन डॉ सीमा अनिल इंगोले यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मोफत वाटप करून शाळेमधील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले.समाजातील बहुसंख्य गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन शिक्षणाची ओढ लागावी.जेणेकरून हे विद्यार्थी भविष्यात चांगले नागरिक बनू शकतील.हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून SDR फाउंडेशनच्या वतीने स्कूल बॅग वितरणाचा हा समाजप्रयोगी कार्यक्रम घेण्यात आला.


या वेळी S D R फौंडेशन च्या चेअरमन सीमा इंगोले, सतिष बोर्डे सामाजिक कार्यकर्ते शाळेच्या मुख्याधिपका ढगे मॅडम, सह शिक्षिका दिपाली बोलके ,व्यवस्थापान समिती चे अध्यक्ष सागर शिंदे, सरपंच जाधव, दत्तू भाऊ जाधव, गणू भाऊ जाधव, शरद जाधव, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here