पाचगांवच्या तरूणांची भोगावती नदीत उडी मारुन अत्माहत्या

0
169

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : गगनबावडा मार्गावर बांलिगा पुलावरून भोगावती नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या. संतोष बाळासो गाडगीळ (रा.पाचगाव, ता.करवीर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. करवीर पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची नोंद झाली आहे.

आज ८ नोव्हेंबर बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बालिंगे पुलाजवळील नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळला. आपत्ती व्यवस्थापनातील पथकाने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर करवीर पोलिसांनी संतोष गाडगीळ यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले.


मंगळवारी सायंकाळी भोगावती नदी पात्रात बालिंगा पुलावरून पाचगाव येथील एका तरुणाने उडी मारण्याचा संशय व्यक्त केला होता. याबाबत पोलीस पाटील बाजीराव मेंगाने यांनी करवीर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती.

तसेच गाडगीळ यांच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. नदीच्या काठावर मोबाईल, दुचाकी आढळून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here