बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने फारच कमी वयात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत कतरिनाने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत.
ती आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन तब्बल 20 वर्षे झाली आहेत.
पीटीआयशी संवाद साधताना कतरिना म्हणाली, ‘माझ्या 20 वर्षांच्या बॉलिवूड प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे काही चित्रपट आहेत. न्यूयॉर्क, मेरे ब्रदर की दुल्हन, राजनिती, सिंग इज किंग, नमस्ते लंडन, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि झिरो हे माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचे चित्रपट आहेत’.
पुढे ती म्हणाली, ‘मी स्वत:ला भाग्यवान समजते. जेव्हा तुम्ही महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक असाल, तेव्हा इतरांशी तुलना करणे स्वाभाविक आहे. कारण तुम्ही कधीही स्थिर होत नाही, तुम्ही नेहमी स्वतःला आव्हान देत असता. हा एक अद्भुत प्रवास आहे, ज्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे’.
कतरिनाने आत्तापर्यंत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघांसह सिनेमांमध्ये काम केलं आहे. कतरिनाला बॉलिवूडची क्वीन असं संबोधलं जातं. कतरिनाने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विदेशातून भारतात येऊन बॉलिवूडमधील आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.