पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडताना भरधाव कारने दुचाकीस दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. गणेश अनिल निकम (वय -२३) असे मृत युवकाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ वैभव अनिल निकम (२१ रा.
सहारा चौक, पेठवडगाव) हा गंभीर जखमी झाला. अंबप फाट्याजवळ आज, गुरुवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, येथील सहारा चौकात राहणारे गणेश व अनिल निकम हे दोघे बंधू अंबप फाट्याजवळ कंपनीत काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी ते कामासाठी निघाले होते.
महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १० बीडब्ल्यु ४६२०) ला जोराची धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील दोघेही भाऊ उडून पडले. यात गणेश याच्या डोक्याला जबरी मार लागला तर वैभव गंभीर जखमी झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतुन प्राथमिक उपचार देत डॉ. वैभव कुंभार यांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण गणेश याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. चारचाकी वाहनामधील महिला रोणीता अहुजा, अनमोल डिक्वेस्टा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णाशी उपचार सुरू आहेत.