जीपच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

0
110

 पुण्याहून गावाकडे परताना आज पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास एका स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात माजलगाव ते गढी फाटा रस्त्यावरील सीरसदेवी गावाजवळ झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर इतर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

लिंबाजी उत्तम चौरे असे मृताचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पाथरी तालुक्यातील श्रीरामपूर वस्ती येथील काही जण सोमवारी पहाटे जीपने ( क्र Mh 14FC1408) पाथरीकडून पुणे परिसरातील उसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते.

कामानंतर बुधवारी पहाटे सर्वजण जीपमधून गावाकडे परतले. दरम्यान, पहाटे ४. ३० वाजेच्या दरम्यान, गढी फाटा ते माजलगाव रस्त्यावरील सीरसदेवी गावाजवळ जीपचा अपघात झाला.


अपघात इतका भीषण होता की यात जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या भीषण अपघातात लिंबाजी उत्तम चौरे याचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश गोपाळ चौरे, बाळू नेहरकर, कैलास सखाराम चौरे हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना बीड येथील शासकीय रुग्णालयात तर एकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त गाडी पाथरी तालुक्यातील मरडसगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्रीरामपूर वस्ती येथील असून गाडी दोन दिवसांपूर्वी काही ऊस तोडणी कामगार याना आणण्यासाठी गेली होती , अशी माहिती गावातून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here