कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द कडे 160 मीटरचा रस्ता महानगरपालिकेने का थांबवला लोकांची बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे या संदर्भातील बातमी एस पी नाईन टीव्ही चॅनल प्रसिद्ध केली होती त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन सात लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ तेव्हा दिनांक 25 फेब्रुवारी 24 रोजी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायत ने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील 160 मीटर रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून यासंदर्भात भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहेत या रस्त्याच्या साईटला कचरा भरपूर प्रमाणात साचला आहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज असल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्या वरून सीपीआर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी केएमटी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलने ये जा करत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकल वरून पडले आहेत पण त्या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार काय यासंदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता 160 मीटरचा तातडीने करण्यात यावा अन्यथा रस्ता रोको सारख्या आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला होता यासंदर्भातील बातमी SP-9 मराठी टीव्ही चॅनेल चे प्रतिनिधी, विजय बकरे यांनी दिली होती .त्याची दखल खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन या रस्त्याला 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 24 रोजी बोंद्रे नगर येथे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजते.