
प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे पाडळी येथील कृष्णात महादेव पाटील यांना दहा दिवसांपूर्वी मुंबई मधील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारा दरम्यान आज पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला .त्यानंतर त्यांचा मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचा मुत्यूदेह कोल्हापूर जिल्ह्यातील त्यांच्या वडणगे पाडळी या गांवी आणण्यात आल्या नंतर अंत्यदर्शन घेताना नातेवाईकांना पाहिले असता मुत् व्यक्ती इतर कोण तरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा या धक्कादायक प्रकारामुळे मुंबई येथील नामांकित रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मात्र नातेवाईक मुत्यूदेह १ मार्च रोजी बदलून आणून मग अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

