चौथ्या मिनी स्टेट स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा स्केटिंग संघ जाहीर

0
258

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य स्केटिंग संघटनेच्या वतीने मुंबई विरार येथे होणाऱ्या चौथ्या मिनी स्टेट स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या वतीने आज जिल्हा स्केटिंग संघाची निवड चाचणी घेऊन सदरचा संघ वरील स्पर्धेसाठी निवडण्यात आला. या निवड चाचणी स्पर्धेची सुरुवात शशिकांत पाटील व ॲडवोकेट पृथ्वीराज शेळके .यांच्या हस्ते करण्यात आली. या निवड चाचणीमध्ये इचलकरंजी. जयसिंगपूर ,गारगोटी ,कोल्हापूर, कागल येथील स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला. होता वरील संघ मुंबई येथे दोन ते तीन मार्च या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे स्पर्धेत चे नियोजन राष्ट्रीय कोच भास्कर कदम. सचिन घोरपडे. रणजीत पीराई. अमित पाटील (पी आ). राष्ट्रीय पंच ॲडवोकेट धनश्री कदम. तेजस्विनी कदम आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू .राज्य स्केटिंग संघटना उपाध्यक्ष.डॉक्टर महेश अभिमन्यू कदम .यांनी केले. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत विजेते पदक मिळवलेल्या पृथ्वीराज पाटील .ओम जगताप. तेजस्विनी कदम. धनश्री कदम आणि सहभागी झालेल्या सुजल पाटील. यश कांबळे. विहान शेळके. तनवी मंद्रूपकर. श्रीशा जाधव यांचा श्री शशिकांत पाटील यांच्या हस्ते व पीआय अमित पाटील यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here