
प्रतिनिधी मेघा पाटील
शिराळा : येथे आज झालेल्या महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मतदार संघातील कार्यकत्यांचा उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. जयंतराव पाटील साहेब, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, शिवसेना (उबाठा) संपर्क प्रमुख नितीन बानूगडे-पाटील, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी स्वागत व प्रास्तविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी केले. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, माजी सभापती भगतसिंग नाईक, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वकील रवी पाटील, विजयराव नलवडे आदींची भाषणे झाली.

याप्रसंगी माजी आमदार बाबासाहेब पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जि. प. माजी अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील, शिवसेना (उबाठा) चे सांगली जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, जि. प. माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील व रणजीत पाटील, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, संजयबापू पाटील, महिला राष्ट्रवादी वाळवा तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, भीमराव पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील, महिला राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस चारूलता पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख बाळासाहेब तांबे, तालुका संघटक सागर घोलप, ज्योत्स्ना पाटील, कुंदाताई पाटील, शिराळा मतदार संघातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजारामबापू, विश्वास, विराज व यशवंत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, युवक मित्र उपस्थित होते. महिला राष्ट्रवादी शिराळा तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी आभार मानले.

