प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक २० ते २९ मे २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्र. ५७ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दिनांक 14 मे 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिर्पामेंट ऑफ सैनिक वेलफेयर, पुणे (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-५७ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावे.
कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी, एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे, एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस. बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल – training.pctenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्र. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे.