प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज २६ एप्रिल रोजी सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा ८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडतं आहे. महाराष्ट्रातील ८ मतदारसंघासंह देशातील ८९ जागांवर आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. देशात भाजपा प्रणीत एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणीत इंडिया अशी लढत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळ पासून चांगली सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उत्साहात सुरूवात झाली तर काही ठिकाणी निरुत्साह दिसून आला. सामान्य मतदारांसह अनेक दिग्गज नेत्यांसह लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांनी देखील त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.