पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे जिल्ह्यात 595 ठिकाणी मतदार जनजागृती…

0
65

  • कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम

कोल्हापूर दि.4 (जिमाका) : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अमोल येडगे व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान करावे, अशा आवाहनाचा संदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पब्लिक ॲड्रेस सिस्टीम) द्वारे दिनांक 4 ते 6 मे दरम्यान दर 2 तासाला देण्यात येणार आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पब्लिक ऍड्रेस सिस्टीम) 595 ठिकाणी कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत 

प्रशासनामार्फत ग्रामीण व शहरी लोकांपर्यंत विश्वासार्ह सूचना, संदेश, माहिती ऑडिओ स्वरुपात तातडीने पोहोचवले जातात. सध्या मतदार जनजागृतीसाठी या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे असणाऱ्या नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर ऑडिओ स्वरुपातील मतदार जनजागृतीचे संदेशही ऑडिओ स्वरुपात प्रसारित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here