शक्तिशाली भारतासाठी मोदींना पंतप्रधान आणि संजय मंडलिकांना खासदार करा ; महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार सभेत बोलताना खा धनंजय महाडिक यांचे आवाहन

0
94

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्यासाठी जागतिक पातळीवर भारताला सक्षम केले आहे. शक्तिशाली भारतासाठी मोदींना पंतप्रधान आणि मंडलिकांना खासदार करा, असे आवाहन राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कळे ता. पन्हाळा जि कोल्हापूर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापुर माजी जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत पन्हाळा शिवसेना तालुका प्रमुख अरुण पाटील यांनी केले.यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभेची निवडणूक संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नसून भारताला जागतिक महासत्ता म्हणून उदयास आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व देण्यासाठी आहे. शक्तिशाली भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे आणि त्यांत सहभागी होण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करा असे आवाहन करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांच्या सत्ता काळातील अनेक कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. दरम्यान करवीर चे माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभेची नाही तर देशाचे कणखर आणि विकासात्मक नेतृत्व ठरविणारी निवडणूक आहे. त्यामुळे असे नेतृत्वगुण असणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले .महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यावेळी बोलताना म्हणाले, खासदार म्हणून मी जिल्ह्यातील रस्ते, विमानतळ, रेल्वे सुविधा यासाठी संसदेत पाठपुरवठा करून निधी आणला. त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघातील गावांच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. तेव्हा मोदींच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हाचे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here