0
363

101 वयाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क…

प्रतिनिधी: विश्वास पाटील

शाहूवाडी तालुका: आज लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून सकाळपासूनच नागरिकांच्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. आपापल्या मतदान केंद्रात लोक आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे .भारतासारख्या विशाल लोकशाही प्रधान देशात हा एक उत्सवच आहे अगदी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे एकंदरीत पाहता नागरिकांच्या मध्ये या मतदानाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.अशीच एक मुक्काम पोस्ट थावडे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर येथील 101 वर्ष पूर्ण झालेली आजी जनाबाई नारायण पाटील आज मतदानाचा हक्क बजावला आहे.एवढे वय होऊन सुद्धा मतदान केंद्रात येऊन स्वतः मतदानाचा हक्क बजावला आहे.SP9 मराठी प्रतिनिधी विश्वास पाटील यांनी घेतलेला खास रिपोर्ट..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here