कोल्हापूरात वुद्ध मतदारांचा रांगेत मुत्यू

0
149

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडतं आहे याचं दरम्यान कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेतील मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका वुद्ध नागरिकाचा मतदान रांगेतच मृत्यू झालाआहे. मतदान केंद्राबाहेरच वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत ही घटना घडली आहे. महादेव श्रीपती सुतार, असं या वृद्ध मतदाराचं नाव आहे. त्यांचं वय ६९ वर्षे असल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापूर शहरातील
उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या वृध्द मतदाराचा मृत्यू झाला आहे. ते रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान करण्यासाठी गेले होते. ते रांगेत उभे असताना महादेव श्रीपती सुतार यांना चक्कर आली. ते खाली कोसळले. त्यानंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली होती. मतदाराने रांगेतच जीव सोडल्यामुळे परिसरामध्ये म हळहळ व्यक्त होत आहे.
चक्कर येऊन खाली पडल्यानंतर ६९ वर्षीय मतदार महादेव श्रीपती सुतार यांना नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here