श्रीराम हायस्कूल दहावी बॅच 2004 मधील विद्यार्थी विद्यार्थिनींचे गेट-टुगेदर संपन्न..

0
385

प्रतिनिधी मेघा पाटील

करवीर/ कोपर्डे : श्रीराम हायस्कूल कोपर्डे येथील वीस वर्षांपूर्वीची दहावीच्या 2004 बॅचची विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी नुकताच गेट-टुगेदर केल.विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी आत्ता सध्या कोण उद्योग व्यवसाय मध्ये आहे तर विविध क्षेत्रात काम करणारे हे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत..त्यांनी तब्बल वीस वर्षानंतर आपल्या दैनंदिन कामातून व्यस्त जीवनातून वेळ काढून गेट-टुगेदर चे आयोजन केले होते.बऱ्याच जणांनी वीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला..त्याचबरोबर दहावी ड बॅचमधील परशुराम कांबळे यांनी लावणी नृत्य करून सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले.तसेच पी कुमार व त्यांच्या टीमने बहारदार गाण्याचा कार्यक्रम करून या गेट-टुगेदरची शोभाा वाढवली.या कार्यक्रमासाठी सर्वांनीच अथक परिश्रम घेतले.हा गेट-टुगेदर आनंदात व उत्साहात साजरा केला.या गेट-टुगेदर साठी विशाल पाटील ,मारुती पाटील, कृष्णा साबळे, जयदीप पाटील ,सुधा पाटील, रेश्मा गावडे ,जयश्री पाटील आणि इतर मित्र – मैत्रीण परिवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here