
प्रतिनिधी : रोहित डवरी
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रूकडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन अतिशय उत्साहामध्ये पार पडला. सुरुवातीला रयत संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम शततारका लॉन्स रुकडी या ठिकाणी आयोजित केला होता. सकाळी ११ वाजता हा विद्यालयातील कला, क्रीडा, व शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाच्या सल्लागार समितीचे चेअरमन एम. बी. शेख, जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील, सहाय्यक विभागीय अधिकारी उत्तम वाळवेकर, स्कूल कमिटीचे सदस्य चिंतामणी मगदूम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्राम पंचायत सदस्य तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर डी माने, उप प्राचार्य जयराम पाटील, लाईफ मेंबर बकरे सर पर्यवेक्षक एस व्ही वजरींकर तसेच विद्यालयातील सर्व रयतसेवक उपस्थित होते यावेळी किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये नॅशनल लेवल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दहावी ब चे विद्यार्थिनी गायत्री नाईक हिचा विशेष सत्कार करण्यात आला . विद्यालयाचे प्राचार्य आर डी माने सर यांच्या हस्ते ११,१११/-रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ही अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला. यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य आर. डी. माने सर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य चिंतामणी मगदूम सर, लाइफ मेंबर बकरे सर, उप प्राचार्य जयराम पाटील सर, पर्यवेक्षक वजरींकर सर उपस्थित होते. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोककला, पाश्चात्य नृत्य, नाटक, विनोदी नृत्य एकूण ३२ गाण्यावर सादरीकरण केले या कार्यक्रम प्रसंगी पालकांनी अतिशय चांगल्या व सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर सेवकांनी आपले मोलाचे योगदान मिळाले.

