संरक्षण सेवेत ऐतिहासिक यश :राजवर्धन दिनकर यादव यांचा कृती फाउंडेशनतर्फे गौरव

0
80


पन्हाळा | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पन्हाळा तालुक्यातील उंडी येथील मूळ असलेले, गोव्यात जन्मलेले व वाढलेले राजवर्धन दिनकर यादव यांनी अखिल भारतीय संरक्षण सेवा परीक्षांमध्ये ऐतिहासिक यश संपादन करत गोवा व महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उज्वल केले आहे. भारतीय हवाई दलातील पायलट पदासाठी तसेच भारतीय तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडंट पदासाठी एकाचवेळी शिफारस मिळवणारे ते मानकरी ठरले आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल कृती फाउंडेशनच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. “आम्ही आहे ना!” या भावनेतून फाउंडेशनने हा पुरस्कार सोहळा संपन्न केला.रेइस मागोस, वेरेम–गोवा येथील रहिवासी असलेल्या राजवर्धन यादव यांनी पहिल्याच प्रयत्नात दोन्ही लेखी परीक्षा, SSB, PSB व FSB यांसह अत्यंत कठीण वैद्यकीय चाचण्या यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. ही कामगिरी त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरली आहे.या पुरस्कार सोहळ्यावेळी दिनकर यादव, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह कृती फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत चुयेकर (अध्यक्ष) होते.यावेळी उपाध्यक्ष रुपाली पाटील, सचिव अश्विनी चुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.राजवर्धन यादव यांचे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी असून, कठोर परिश्रम आणि ध्येयावर विश्वास ठेवल्यास कोणतेही स्वप्न अशक्य नाही, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here